…मग प्रत्येक वाक-वळणावर भेटत राहतो कधी डाकबंगला, कधी डचांची वखार, तर कधी सड्यावरची धनगर वस्ती...
आज आता हे सगळं आठवतानाही मी मनानं केव्हाच बार्सू-राजापूरला पोचलोय. लहानपणी आजोळ असलेलं बार्सू आणि राजापूरच्या परिसरात केलेली ती भन्नाट भटकंती मला अजून भारावून आहे. त्या प्रभावातून मी अद्याप बाहेर पडलेलो नाही आणि बाहेर पडण्याची इच्छाही नाही. उलट दिवसेंदिवस त्या परिसरात हिंडण्याची-फिरण्याची हौस वाढतच आहे. म्हणूनच ती हौस फिटवण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळते, मी निघतो मुशाफिरीला राजापूरच्या.......